गावाविषयी माहिती
मांजरगाव हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रगतिशील व ऐतिहासिक असे गाव आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावची लोकसंख्या सुमारे ११२० आहे . गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १, अंगणवाडी केंद्र १, व्यायामशाळा १ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहे तसेच चार मंदिर, सामुदायिक सभागृह, पाणी साठवण टाकी, सार्वजनिक विहिरी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहे. गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ऊस कांदा सोयाबीन मका टोमॅटो ही प्रमुख पिके घेतली जातात .ऊस व कांदा पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मांजरगाव ग्रामपंचायत अंतर्गत विविध योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत प्रधानमंत्री घरकुल योजना ,शबरी घरकुल योजना,रमाई घरकुल योजना अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला आहे .स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गावास संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF)दर्जा मिळाला आहे. पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात येतो. ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच असे ८ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात… ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात….
मांजरगाव निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.
भौगोलिक स्थान
मांजरगाव हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. गावाची एकूण क्षेत्रफळ चौरस ६ हे असून ग्रामपंचायत मध्ये ३ वार्ड आहेत. एकूण कुटुंब येथे वास्तव्यास असून लोकसंख्या ११२० आहे त्यामध्ये पुरुष ५७१ व महिला ५४९ यांचा समावेश होतो. गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेती योग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहेत गावा लगत नांदूर मधमेश्वर धरण साठा असून येथून पिकांना पाणीपुरवठा होतो. येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे उन्हाळ्यात तापमान साधारण ३८ अंश सेल्सिअस पर्यंत जाते. हिवाळ्यात ८ अंश सेल्सिअस पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० सेंटिमीटर पर्जन्यवृष्टी होते.
मांजरगाव हे ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध असून परिसरात धरण क्षेत्र असल्याने जल संधारनाची चांगली सोय आहे.
लोकसंख्या
पुरुष
स्त्रिया
एकूण
लोकजीवन
मांजरगाव चे लोकजीवन साधी राहणी, श्रमप्रदान व पारंपारिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून ऊस,कांदा सोयाबीन व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन व लघुउद्योग यामध्ये कार्यरत आहेत. गावात विविध सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक परंपरा झोपल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव सण, गावात भरवला जाणारा मारुती मंदिर सप्ताह, गावाच्या एकात्मतेच दर्शन घडवतो. गणेश उत्सव, दिवाळी नवरात्र, महाशिवरात्री, अक्षयतृतीया आनंदाने व एकोप्याने साजरा करतात.तसेच स्थानिक देवतांच्या पूजाना विशेष महत्त्व आहे.
येथील लोक मेहनती मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारी आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्राम विकास व स्वयं सहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मांजरगावच्या लोक जीवनात पारंपारिक ग्रामीण संस्कृती सोबतच आधुनिकतेची झलकही दिसते. ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.
संस्कृती व परंपरा
मांजरगावचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे ते वर्षभर विविध धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गणेशोत्सव,नवरात्र, दिवाळी होळी, महाशिवरात्र यासारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणामुळे गावातील मुलं, तरुण ,वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंद उत्सव साजरा करतात. गावात लोककला कीर्तन भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यानपिढ्यात चालत आलेल्या परंपरा जतन करण्यात नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते. स्त्रियांचा सहभाग ग्राम विकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात असतो. स्वयंसहायक गटाद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात त्यामुळे मांजरगावचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत एकात्मतेने टिकून आहे.


प्रेक्षणीय स्थळ
गावातील ममलेश्वर मंदिर हे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात..
- मारुती मंदिर गावाच्या मध्यवर्ती भागात असलेने हे मंदिर उत्सव व सणासुदीला ग्रामस्थांच्या भेटी— गाठींचे केंद्र आहे.
- शेती क्षेत्र मांजरगाव हे ऊस व कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावातील हिरवीगार शेती आणि उसाची शेती पाहण्याजोगी आहे. जलसंधारण प्रकल्प पाणलोट क्षेत्राचा विकास व जलसंधारणाची चांगली सोय यामुळे परिसरात नैसर्गिक सौंदर्य खुलून दिसते.. त्यामुळे नांदूर मधमेश्वर अभयारण्य सारखे पर्यटन स्थळ मांजरगाव लगत आहे.
- जवळची गावे मांजरगाव निफाड तालुक्यातील व सिन्नर तालुक्यातील जोडणारे ठिकाण आहे. आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे मांजरगावाशी सामाजिक ,शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिक दृष्ट्या जोडलेली आहेत. मांजरगावच्या जवळपास सायखेडा, निफाड, सिन्नर ह्या मोठ्या बाजारपेठा आहेत..
गटविकास अधिकारी

गटविकास अधिकारी
ग्रामपंचायत प्रशासन

सौ. वंदना सुनील सोनवणे
सरपंच

श्री. शंकर महादु गांगुर्डे
उपसरपंच
ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचेकडे मिळणारे दाखले
जन्म नोंद दाखला
मृत्यु नोंद दाखला
विवाह नोंदणी दाखला
शिक्षण विभाग
अंगणवाडी विभाग
अंगणवाडी नाव | मुले | मुली | एकूण |
---|---|---|---|
अंगणवाडी क्र.१ | 11 | 07 | 18 |
अंगणवाडी सेविका माहिती
नाव | पद |
---|---|
सौ.मंगल नरहरी गांगुर्डे | अंगणवाडी कार्यकर्ती |
श्रीमती.विजया नामदेव वाईकर | मदतनीस |
जिल्हा परिषद शाळा
इयत्ता | मुले | मुली | एकूण |
---|---|---|---|
पहिली | 02 | 04 | 06 |
दुसरी | 03 | 07 | 10 |
तिसरी | 03 | 02 | 05 |
चौथी | 01 | 02 | 05 |
एकूण | 09 | 15 | 24 |
अंगणवाडी सेविका माहिती
नाव | पद |
---|---|
श्री.नरेंद्र धनाजी पवार | मुख्याध्यापक |
श्री.दिपक धनाजी | सुरंजेशिक्षक |
सौ. सोनाली राहुल बिडवे | मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी |
आरोग्य विभाग
अ.नं. | नाव | आरोग्य विभाग पद |
---|---|---|
1. | डॉ.सुजित कोशिरे | तालुका वैदकीय अधिकारी |
2. | डॉ. संजय दाणी | PHC वैदकीय अधिकारी |
3. | श्रीमती. चारुलता सातपुते | उपकेंद्र वैदकीय अधिकारी |
4. | श्री. सांडू संसारे | आरोग्य सेवक |
5. | श्रीमती. शितल पाटोळे | आरोग्य सेविका |
6. | सारिका संपत गांगुर्डे | आशा कार्यकर्ती |
सिमेंट बंधारे
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या मांजरगाव या गावाच्या जवळच हे धरण आहे. कडवा आणि गोदावरी या दोन्ही नद्यांच्या संगमावर हे धरण बांधण्यात आलेलं आहे. १९०७ ते १९१६ काळात इंग्रजांनी हे धरण बांधले. २००८ साली धरणाचे मजबुतीकरण करण्यात आले.
नांदूर मधमेश्वर धरणाची उंची १४.९१मीटर म्हणजे ४८.९२ फूट तर लांबी ११०४ मीटर म्हणजे ३६२२ फूट आहे. धरणाची पाणी साठविण्याची क्षमता १.०६ टीएमसी म्हणजे १०६० दशलक्ष घनफुट इतकी आहे. धरणाला दोन बाजूनी दरवाजे आहेत. एका बाजूला ५ तर दुसऱ्या बाजूला ३ दरवाजे आहेत.
धरणातून जाणाऱ्या दोन कालव्यांचा उपयोग शेतीसाठी केला जातो.
गॅलरी


